घरताज्या घडामोडीAyodhya Deepotasav 2021: १२ लाख दिव्यांनी उजळली रामभूमी अयोध्या, गिनिजबुकमध्ये नोंद

Ayodhya Deepotasav 2021: १२ लाख दिव्यांनी उजळली रामभूमी अयोध्या, गिनिजबुकमध्ये नोंद

Subscribe

यंदा अयोद्धेत १२ लाख दिव्यांचा नव्या रोकॉर्ड तयार करण्यात आला असून यादी नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.  शरयू नदीच्या काठी ९ लाख दिवे तर पैडी येथे २ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील अयोद्धेत १० लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. ही कामगिरी गिनीब बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी अयोद्धेतील एकूण ३२ घाटांवर दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सुंदर लेझर लाइट शो देखील आयोजित करण्यात आला आहे. अयोद्धेत प्रसिद्ध राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे यंदाच्या दिवाळीत अयोद्धेत मोठी धुमशान पहायला मिळत आहे. दीपोत्सव म्हणजेच दिव्यांचा सण. अयोद्धा नगरीत हा सण मोठ्या जल्लोषात आणि दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात साजरा केला जातो. अयोद्धेत सध्या फार प्रसन्न आणि दिव्यांच्या तेजात उजळलेले वातावरण निर्माण झाले आहे. दिपोत्सावाच्या पहाटे आयोद्धेतील हा दीपोत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -