घरदेश-विदेशजगन्नाथपुरी रथ यात्रेवर २८४ वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

जगन्नाथपुरी रथ यात्रेवर २८४ वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

Subscribe

ही यात्रा रद्द झाली तर २८४ वर्षांपासून सुरू असलेल्या रथ यात्रेच्या परंपरेत पडणार खंड

कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता यंदा जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेवर संकट ओढावण्याची दाट शक्यता आहे. ३ मेनंतर लॉकडाऊन वाढवण्यात आला तसेच कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर पुरीची रथ यात्रा रद्द होऊ शकते. ही यात्रा रद्द झाली तर २८४ वर्षांपासून सुरू असलेल्या रथ यात्रेच्या परंपरेत खंड पडणार हे नक्की.

यंदा २३ जून रोजी या रथ यात्रेचे नियोजन असल्याने अक्षय्य तृतीयेपासून या यात्रेची तयारी सुरू देखील करण्यात आली आहे. दरम्यान, पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या सेवा संघटनेचे दैत्यपती निजोग यांनी लॉकडाऊन दरम्यान या रथयात्रेसाठी विनंती केली आहे. या विनंतीत संघटनेने असे म्हटले आहे की, बर्‍याच वेळा साथीच्या रोगांतही रथयात्रा थांबली नाही. अशा परिस्थितीत जुना इतिहास डोळ्यासमोर ठेवून यंदाही रथयात्रेला परवानगी देण्यात यावी.

- Advertisement -

कैलास मानसरोवर यात्रा देखील अशक्य

कोरोनामुळे यावर्षी कैलास मानसरोवर यात्रा होणं हे देखील अशक्यच आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाची कैलास यात्रा घेणारी संस्था कुमाऊं मंडल विकास निगमच्या अधिकाऱ्यांशी कोणतीही बैठक झाली नसून किंवा तशा सूचना देखील देण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कोरोनाचा कहर आणि वाढता संसर्ग बघता यंदा कैलास मानसरोवर यात्रा देखील शक्य नाही ,असे कुमाऊं मंडल विकास निगमकडून सांगण्यात आले आहे.


अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय मागे; २३ जूनपासून यात्रा सुरू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -