Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthPeriods वेळी रॅशेजची समस्या उद्भवल्यास पॅड खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Periods वेळी रॅशेजची समस्या उद्भवल्यास पॅड खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Subscribe

हेल्दी रिप्रोडक्टिव लाइफसाठी मेंस्ट्रुअल हाइजीनची काळजी घेणे फार महत्वाचे असते. यासाठी पीरियड्स दरम्यान पॅड्सचा वापर केला जातो. अशातच जेव्हा तुम्ही पॅड्स वापरता तेव्हा काही वेळेस असे होते की, तुम्ही रनिंग, वॉकिंग किंवा अन्य प्रकारच्या अॅक्टिव्हिटी केल्यानंतर रॅशेज येतात. यामुळे योनित इंफेक्शन सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पॅड्स खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्वाचे असते. पॅड्स खरेदी करताना तुमचा ब्लड फ्लो सुद्धा पहावा. या व्यतिरिक्त त्याचा आकार ते फॅब्रिक अशा प्रकारच्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

पॅडची साइज
पीरियड्सची जेव्हा सुरुवात होते तेव्हा फ्लो अधिक असतो. याच हिशोबाने तुम्ही पॅड्सची साइज निवडू शकता. या व्यतिरिक्त डे आणि नाईटच्या हिशोबाने ही पॅड निवडा. यावेळी तुम्ही सकाळी 17 सेमी ते 25 सेमीचा पॅड वापरु शकता. रात्रीच्या वेळी तुम्ही एक मोठा पॅड तुम्ही वापरु शकता.

- Advertisement -

ब्रीथएबल मटेरियल
पीरियड्स दरम्यान कॉटन आणि प्लास्टिक नेट पासून तयार केलेले पॅड्स अगदी सहज मार्केटमध्ये मिळतात. परंतु पीरियड्सवेळी त्याच पॅड्सची निवड करा जे तुमच्यासाठी आरामदायी असतील. तुमच्या स्किन नुसार पॅड निवडा. यावेळी नेहमीच लक्षात ठेवा की, मटेरियल पूर्णपणे ब्रीथएबल असेल. जेणेकरुन तुम्हाला स्किनवर रेडनेस आणि इचिंगची समस्या उद्भभवणार नाही.

- Advertisement -

एब्जॉर्ब करण्याची क्षमता
नेहमीच या गोष्टीची काळजी घ्या की, पॅड्सची निवड करताना त्यांच्यात एब्जॉर्ब करण्याची किती क्षमता आहे हे पहा. त्याचसोबत उठताना -बसताना ब्लड लीक होणार नाही ना हे सुद्धा पहा. पॅडवर ब्लडचा रंग लाल असेल तर असे समजा की, पॅड ब्लडला पूर्णपणे एब्जॉर्ब करत आहे.

स्किन सेंसिटीव्हिटी
तुमची त्वचा कशी आहे याकडे लक्ष द्या. जर तुमची स्किन सॉफ्ट असेल तर तुम्ही इनर थाइजवर रॅशेजची समस्या येऊ शकते. त्यानुसार तुम्ही कॉटन पॅड्स किंवा मऊ पॅड्सचा वापर करु शकता. यामुळे इरिटेशनच्या समस्येपासून दूर रहाल. त्याचसोबत हाताने स्पर्श करु पहा की, पॅड किती अधिक सॉफ्ट आहे.

ब्लड फ्लो
आपल्या शरिराचा आकार आणि ब्लड फ्लोच्या हिशोबाने पॅड्सची निवड करा. तुमचा ब्लड फ्लो अधिक असेल तर त्यानुसार पॅडचे मटेरियल आणि साइज पहा.


हेही वाचा- धुम्रपान करणाऱ्या महिलांनो सावधान, सेक्शुअल लाइफवर होतो थेट परिणाम

- Advertisment -

Manini