घरताज्या घडामोडीअपक्ष आणि इतर पक्षांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआयची भीती दाखवतेय; संजय राऊतांचा...

अपक्ष आणि इतर पक्षांना फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआयची भीती दाखवतेय; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

"भारतीय जनता पक्ष (BJP) अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना अमिश दाखवणार, प्रलोभना दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी (ED) आणि सीबीआयची (CBI) भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे'', असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.

भारतीय जनता पक्ष (BJP) अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे या पक्षांना अमिश दाखवणार, प्रलोभना दाखवत आहे. शिवाय त्यांना ईडी (ED) आणि सीबीआयची (CBI) भीती दाखवत मत फोडण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसेच, “भाजपाने यासाठी पैसे वाया घालवू नये कोणत्यातरी सामाजिक कार्यासाठी वापरावे” असा सल्लाही राऊतांनी दिला.

निवडणूक लढायचा निर्णय पक्का

- Advertisement -

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी ते आम्ही निवडणूक लढवणार, या मतावर ठाम राहिले. त्यामुळे राजकारणात कोणी कोणाला रोखू शकत नाही. पण जर त्यांनी निवडणूक (Elections) लढायचा निर्णय पक्का केला असेल, तर महाविकास आघाडीसुद्धा या राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्हीसुद्धा मजबूतीने या निवडणुकीत उतरलेलो आहोत. प्रश्न सहाव्या जागेचा आहे आणि या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजेच ते या पक्षांना अमिश दाखवणार, प्रलोभना दाखवणार, त्यांच्यावर वेगळ्यावेगळ्या मार्गाने दबाव आणणारय. परंतु, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय याची माहिती आमच्याकडे रोज येतेय. ज्यांच्यावर भाजपा दबाव आणते ते, आमचेच मित्र असून, ते आम्हाला सांगत आहेत कशाप्रकारे आम्हाला प्रेशर्स हे देत आहेत. शिवाय ईडी, सीबीआयची भीती दाखवते आहे. यामुळे भाजपाचे चारित्र्या उघड होतेय.”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा – आम्ही आमचा उमेदवार मागे घेणार नाही; चंद्रकांत पाटलांचे ‘मविआ’ला प्रत्युत्तर

- Advertisement -

महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार

‘महाराष्ट्रात अशाप्रकारे निवडणुका लढवल्या जात असतील, तर या राज्याची जनता डोळसपणे सगळं पाहातेय. सहावी जागा किंबहून चारही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार आहे. त्यामुळे उगाच भारतीय जनता पक्षाने त्यांचे पैसे वाया घालवू नये. तेच पैसे एका सामाजिक कार्यात वापरावे’, असा सल्ला राऊतांनी दिला.

हेही वाचा – Rajya Sabha elections: मतदानासाठी अनिल देशमुखांचा न्यायालयात अर्ज

“बाकीचं काय ते आम्ही बघून घेऊ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे समर्थ आहेत. निवडणुका या काय आम्ही आता लढत नाही आहोत, गेली ५० वर्षे निवडणुका लढतोय.”, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

आम्ही निवडणूक लढवणार

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी आज विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. या बैठकीत राज्यसभेत (Rajya Sabha Election) आमचा उमेदवार बिनविरोध राज्यसभेत पाठवा. आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत तुमचा उमेदवार बिनविरोध निवडून आणू, असा प्रस्ताव आघाडीकडून भाजपाला (BJP) देण्यात आल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी दिला होता. मात्र महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव भाजपाच्या नेत्यांनी फेटाळत आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं.


हेही वाचा – भाजप तिसरी जागा शंभर टक्के जिंकणार, चंद्रकांत पाटलांना विश्वास

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -