घरमहाराष्ट्र'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'; मुंबईत लागलेल्या होर्डिंग्सची चर्चा

‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’; मुंबईत लागलेल्या होर्डिंग्सची चर्चा

Subscribe

अशात आता मुंबईत लावलेले बॅनर हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्या बॅनरवर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केल्यानंतर भाजपनंही त्यावर पलटवार केलाय. विशेष म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनीसुद्धा नेहरूंवर टीकास्त्र डागून नव्या वादाला फोडणी दिलीय. एकंदरीतच स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी या महापुरुषांवर चिखलफेक करण्यात येत आहे. इतिहासाचे दाखले देत महापुरुषांना लक्ष्य केलं जातंय. दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विभागाने हाती घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिलीय. त्यावरही मुंबईचे खच्चीकरण करण्यासह तिला ओरबाडण्याचे काम सुरू असल्याची टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.

अशात आता मुंबईत लावलेले बॅनर हे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्या बॅनरवर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. हे विधान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे असून, केसरी या त्यांच्या वर्तमानपत्रात त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखाची ही हेडलाईन होती. टिळकांचे अग्रलेख हाच ‘केसरी’चा आत्मा असायचा. टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, अशा मथळ्याखाली अग्रलेख लिहिला होता. आता तोच धागा पकडून मुंबईत हे बॅनर झळकावण्यात आले आहेत. मुंबईच्या माहीम आणि सायन परिसरात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचे होर्डिंग लागले आहेत. पण हे होर्डिंग्स नेमके कोणी लावले, याबाबत काहीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मुंबईत होर्डिंग्स लावण्यामागे काही मार्केटिंगचा फंडा आहे की काय, याबद्दलही काही समजलेले नाही.

- Advertisement -

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, अनधिकृत बांधकामे, आवाक्याबाहेरची गर्दी यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील झालं होतं. आता पावसाळा संपला असला तरी कोणीतरी या बॅनरच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. गेल्या तीन महिन्यांत राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिलीय. मुंबई महापालिकेत सध्या हुकूमशाही असून केवळ बदल्या, निविदा आणि वेळकाढूपणा चालल्याचा आरोपही आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला होता. त्यामुळे शहराचे आणि पर्यायाने मुंबईकरांचे नुकसान होत असून, निधीचीही उधळपट्टी सुरू असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणालेत. आता बॅनर्सच्या माध्यमातून मुंबईत सामान्यांच्या याच प्रश्नांचा कदाचित वाचा फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईच्या माहीम आणि सायन परिसरात सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा आशयाचे होर्डिंग्स लावण्यात आलेत. पण हे होर्डिंग कोणी लावले याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच यामधून ते लावणाऱ्यांना नेमकं काय म्हणायचंय हेही कळू शकलेले नाही. सध्या हे होर्डिंग सामान्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.


हेही वाचाः राज्यपालांनी छत्रपती शिवरायांची थेट पवार, गडकरींशी केली तुलना; म्हणाले ‘हेच सध्याचे आदर्श’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -