घरमहाराष्ट्रहिंगणघाट पीडितेचा खटला फास्ट ट्रॅकवर

हिंगणघाट पीडितेचा खटला फास्ट ट्रॅकवर

Subscribe

३ फेब्रुवारी रोजी वर्ध्याच्या हिंगणघाटमधल्या नांदोरी चौकात एका प्राध्यापिकेवर एकतर्फी प्रेमातून पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये ही तरुणी ४० टक्के भाजली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून या घटनेतील आरोपी विकेश नगराळे याला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी आता केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. सरकारच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम पीडित तरूणीची बाजू मांडणार आहेत. दरम्यान, हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरण ज्या कायद्यान्वये प्रकरणाची जलद गतीने सुनावणी होऊन शिक्षा होण्यासाठी करण्यात आलेला कायदा महाराष्ट्रात देखील करण्याचा विचार असल्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

गृहमंत्री जाणार हैदराबादला

दरम्यान, या प्रकरणाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी स्वत: अनिल देशमुख आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हैदराबादला जाणार असून तिथले गृहमंत्री आणि वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. त्यानंतर स्थानिक कायदा महाराष्ट्रात कशा पद्धतीने आणता येईल, याचा अभ्यास करून लवकरात लवकर पाऊल उचलू, असं देखील अनिल देशमुख यांनी सांगितलं.

- Advertisement -

नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये सध्या पीडितेवर उपचार सुरू असून तिच्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तिच्या चेहरा आणि हाताला जळाल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय सध्या ती पूर्णपणे कृत्रिम श्वासोच्छवासावर असल्यामुळे डॉक्टरांनी निगराणीखाली तिच्यावर उपचार सुरू ठेवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -