घरताज्या घडामोडीSharad Pawar : UPA अध्यक्षपदाबाबत पवारांनी स्पष्ट केली स्ट्रॅटेजी, म्हणाले...

Sharad Pawar : UPA अध्यक्षपदाबाबत पवारांनी स्पष्ट केली स्ट्रॅटेजी, म्हणाले…

Subscribe

देशपातळीवर युपीए अध्यक्षपद स्विकारण्याबाबत मी याआधीही अनेकदा नकार दिला आहे. मी वैयक्तिक पातळीवर स्वतः तयार नाही, असेही मी सांगितले आहे. अनेक राजकीय पक्षांकडून मला अध्यक्षपद स्विकारण्याबाबत सांगण्यात येते, पण आमचा राजकीय पक्ष म्हणून तसा सेट अप नाही. देशातील भाजप सोडून इतर समविचारी पक्षाबाबतच्या लोकांची बैठक घेतली पाहिजे अशी मागणी ममता बॅनर्जी यांनीही माझ्याकडे केली आहे. मी सगळ्या पक्षांना संपर्क करावा असेही त्यांनी म्हटले आहे. त्यानुसार लवकरच गैरभाजप राजकीय पक्षांना मी संपर्क साधणार असल्याचेही शरद पवारांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (sharad pawar on UPA chairmanship across india in non bjp state)

आमच्या पक्षातूनही मला युपीएचे अध्यक्षपद भूषवण्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या आमच्या पक्षाचा तसा सेट अप नाही, असेही पवार म्हणाले. त्यामुळे राजकीय पक्षांनी एकत्र यायला हवे. त्यासाठीचा राजकीय पक्षांसोबतचा संपर्क मी आगामी दिवसात संपर्क करणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मविआ सरकार ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करणार

केंद्रीय तपास यंत्रणांकडून देशात अनेक ठिकाणी कारवाया सुरू आहे. खासदार आणि संपादक संजय राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर मांडाल आहे. त्यासोबतच केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांमुळे महाराष्ट्रातील सरकारला कोणताही धोका नाही. हे सरकार उरलेली अडीच वर्षे पूर्ण करेल. तसेच आगामी निवडणुकीतही निवडून येईल, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सुरू असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेची आघाडी ही कायम राहणार आहे. त्यामुळे भाजपला काहीही वाटल तरीही त्याचा फरक पडत नसल्याचे पवार म्हणाले. याआधी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आमची कोणतीही कटुता नसल्याचे स्पष्ट केले होते.


Sharad Pawar-Narendra Modi : शरद पवारांनी संजय राऊतांवरच्या कारवाईवरचा मुद्दा मोदींसमोर मांडला

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -