घरताज्या घडामोडीशवागृहातील शवांच्या विल्हेवाटीला 'या'मुळे होतोय विलंब

शवागृहातील शवांच्या विल्हेवाटीला ‘या’मुळे होतोय विलंब

Subscribe

कोविड बाधित रुग्णांचा मृतदेहाची २४ तासांमध्ये विल्हेवाट लावण्याचा नियम असला तरी प्रत्यक्षात नातेवाईक पुढे येत नसल्याने अनेक मृतदेह सात ते दहा दिवसांपर्यंत पडून राहत आहे.

कोविड बाधित रुग्णांचा मृतदेहाची २४ तासांमध्ये विल्हेवाट लावण्याचा नियम असला तरी प्रत्यक्षात नातेवाईक पुढे येत नसल्याने अनेक मृतदेह सात ते दहा दिवसांपर्यंत पडून राहत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट वेळीच लागत नसल्याने शवागृहातील अनेक कर्मचाऱ्यांना कोविडची बाधा होत असल्याची बाब समोर आहे.

कोरोना कोविड १९च्या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत सुमारे ६७ हजार ६५७ रुग्ण झाले असून मृतांचा आकडा पावणे चार हजारांवर पोहोचला आहे. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या रुग्णाचा मृतदेह अर्ध्या तासात वॉर्डात शवागृहातील आणि शवागृहातून २४ तासांच्या आतमध्ये अंतिम संस्कारासाठी पाठवण्याचे नियमांत आहे. परंतु, अनेक रुग्णांचे नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असल्याने तसेच काही नातेवाईक पुढे यायलाच तयार नसल्याने मृतदेह शवागृहातील पडून असून क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह असल्याने मधल्या व्हरांड्यात स्ट्रेचरवर ठेवले जात आहेत.

- Advertisement -

मात्र, शवागृहातील कोविड रुग्णांच्या मृतदेहांची वेळीच विल्हेवाट लावली जात नसल्याने अनेक कामगारांना कोविडची बाधा होत आहे. केईएम रुग्णालयाच्या शवागारातील १२ पैकी १० कामगारांना कोविडची बाधा झालेली असून कस्तुरबा, शीव, नायर, राजावाडी आदी शवागृहातील कामगारांनाही कोविडची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याला निकृष्ट दर्जाचे बॉडी बॅग्ज वापरले जात असल्यानेच हा धोका निर्माण होत असल्याचेही बोलले जात आहे.

म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदिप नारकर यांनी याबाबत बोलताना केईएम शवागृहातील १० कामगारांना कोविडची बाधा झाली असल्याचे स्पष्ट केले. शवागृहातील मृतदेहांची विल्हेवाट वेळेवर लावली जात नसल्यानेच ही बाधा झाली आहे. तसे पाहिल्यास शवागृहातील मृतदेहाची विल्हेवाट १२ तासांमध्ये व्हायला हवी. परंतु, या शवागृहात सात ते बारा दिवसांपर्यंत शव पडून असतात. त्यामुळेच शवागृहातील कामगारांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. बऱ्याच प्रकरणात मृतांचे नातेवाईक पुढे येत नसल्याने हे शव पडून राहत असून या शवांची विल्हेवाट नियोजित वेळेत केल्यास कामगारांच्या जिविताचा धोका टळू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नव्या बॉडी बॅगेज मजबूत आणि सुरक्षितच

मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या नव्या बॉडी बॅगेजवरून वाद निर्माण होत भ्रष्टाचाराचे आरेाप होत आहेत. पूर्वीच्या १ हजार ३०० रुपयांच्या तुलनेत या बॉडी बॅग ६ हजार ५०० रुपयांना खरेदी केल्याने आरोप होत आहे. नव्याने खरेदी केलेल्या बॅगमुळे शवागृहातील कर्मचाऱ्यांसह शव घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांनाही संसर्गाची बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. या बॅगबाबत आरोप झाल्यानंतर, महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांनी जुन्या आणि नवीन अशा दोन्ही बॅगांमध्ये पाणी भरुन पाहिले. त्यामध्ये जुन्या बॅगेत पाणी झिरपून गेले तर नवीन बॅगेतील पाणी तसेच कायम होते. तसेच शवागारातील कामगारांनीही पूर्वीच्या बॅग पेक्षा आता खरेदी केलेल्या बॉडी बॅग या मजबूत आणि सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नव्याने खरेदी केलेल्या बॉडी बॅग या पूर्वीपेक्षा खूप पटीने मजबूत आणि सुरक्षित असल्याचेही म्युनिसिपल मजदूर युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी स्पष्ट केले.

कोविड रुग्णांच्या शवांची क्षमता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -