घरताज्या घडामोडीवैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवाल तर कारवाई होणार

वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवाल तर कारवाई होणार

Subscribe

नायर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना रक्ताच्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या करणं सोप होणार असून आता खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, असं झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री तनपुरे यांनी विधानसभेत दिली आहे.

पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना रक्ताच्या कोणत्याही प्रकारच्या चाचण्या करणं सोप होणार असून आता खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, असं झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री तनपुरे यांनी विधानसभेत दिली.

अन्यथा कारवाई केली जाणार

रूग्णांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार करण्यात यावेत. तसेच विविध आजाराचे निदान करण्यासाठी रक्तातील सीबीसी तपासणी करणाऱ्या ट्रीव्हीट्रॉन मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत चार मशिन कार्यरत असून रूग्णांना जर कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी खासगी लॅबमध्ये जावे लागणार नाही, असे घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

- Advertisement -

काय म्हणाले राज्यमंत्री तनपुरे?

मुंबई शहर आणि त्यालगतच्या परिसरातील रूग्णांच्या आजारावर निदान करण्यासाठीच्या मशिनबाबत सदस्य अॅड. अशोक पवार यांनी लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री तनपुरे बोलत होते.
की, ‘२००३-२००९ कालावधीत जर्मन कंपनीच्या तीन मशिन रक्त तपासणीसाठी ट्रीव्हीट्रॉन सीबीसी मशीन घेण्यात आल्या होत्या. त्यातील एक मशिन मुदतीपूर्व बंद पडल्याने कंपनीकडून ही मशिन बदलून नवीन मशिन घेण्यात आली आहे. यादरम्यान, दोन मशिन सुयोग्य स्थितीत कार्यरत होत्या. कोणत्याही रूग्णांना रक्ताच्या सीबीसी तपासणीसाठी बाहेर जावे लागले नाही. वाढती लोकसंख्या पाहता शासनाने नुकतेच सहा पार्ट सेल्स तपासणी करण्यात येणारे अत्याधुनिक मशिन खरेदी केले आहेत. भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मशिन खरेदी करून जास्तीत जास्त रूग्णांना सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शासकीय रूग्णांना कोणतीही वैद्यकीय चाचणी करण्यासाठी खाजगी लॅबमध्ये जावे, लागण्यासंदर्भात तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार’, असल्याचेही राज्यमंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा – प्रत्येक जिल्हा हॉस्पिटलमध्ये करोना‌ विलगीकरण वॉर्ड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -